Write- right way to be yourself!
Friday, 14 November 2014
Tuesday, 19 February 2013
माझी सुरुवात
" कशास हवे पंख मला
दे बळ मला हत्तीचे
नको कराया मला चाकरी
सामर्थ्य दे मला माझ्या लेखणीचे..
करीन मी प्रहार तो
जी असेल सिहांची गर्जना
करेल ती भांडार खुले
नव्या नव्या चेतनांचे
मी काय सांगे जगाला
ती ठरावी एक दिशा
सहस्त्र अश्या चेतानांनी
पाऊल उठावे नव्या क्रांतीचे "
लहानपणातच मराठी भाषेतील विविध साहित्याची ओळख झाली आणि मराठी भाषेतील शब्दांची ताकद मलाही कणखर बनवत गेली कधी खूप छान घडलं कि शब्दही आनंदी होतात आणि मन मुक्त होऊन आनंद व्यक्त करतं…. खळखळ शब्दांतूनच! काही कुठे खुट्ट झालं कि मग शब्दही नाराज होतात आणि व्यक्त होतात काही दुःखी भावना … असच काहीतरी सुचत जातं आणि कुठेतरी मी माझ्यात गुंगत जाते. माझ्या कविता ., माझे शब्द माझ्यासाठी नवीन जग निर्माण करतात …. जे असतं फक्त माझं विश्व !
अशाच माझ्या विश्वातून साकार झालेल्या कविता, लेख .,काही विचार तुमच्या सोबत share करायला नक्की आवडेल आणि तुमच्या सोबत संवाद करायला हि नक्की आवडेल ….
हीच माझी सुरुवात माझ्या Write-Right way to be yourself ह्या blog मधून .............................
Subscribe to:
Posts (Atom)